Tumbe Group of International Journals

Full Text


Physical education and sports in India – An Exercise.

Sunil Jalhare1

1 Head of Department and Assistant Professor,

Godavari Arts College, Ambad, Distt. Jalna. Maharashtra.

drsuniljalhare@gmail.com

Abstract

In the present era, physical education has become an integral part of education. Through physical, mental and emotional development of a person through physical education and sports, positive work is being done from a scientific point of view to create a capable generation by creating an all-round personality. Instead of just strengthening the muscles through movement and exercise, the educational experience is also enriched more and more.

In the presented research essay, an attempt has been made to shed light on various aspects related to physical education and sports. We are of the view that Indian society sports have made a long journey on the path of their progress. Presently, Indian sportspersons are making eye-catching progress at the international level due to the improvement in the condition of sports in India and due to the guidance provided by physical and sports education. If you get positive results in all sports, especially in athletics, it is a good sign for the country. We can hope in the future that the Indian tricolor will be raised high by sports performance, due to the authentic efforts of the government scheme and sports policy or both.

Keywords: sportsman, health, physical education, sports, national development.


भारतातील शारीरिक शिक्षण आणि खेळ – एक अभ्यास.

प्रा. डॉ.सुनील जल्हारे,

विभाप्रमुख व सहायक प्राध्यापक,

गोदावरी कला महाविद्यालय अंबड, जि. जालना. महाराष्ट्र.

drsuniljalhare@gmail.com

गोषवारा:

सध्याच्या युगात शारीरिक शिक्षण हे शिक्षणाचे महत्वाचे अविभाज्य असे अंग बनले आहे. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा याद्वारे व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास साधून सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्वनिर्माण करून एक सक्षम पिढी तयार करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सकारात्मक कार्य केले जात आहे. हालचाल व व्यायामाच्या माध्यमातून केवळ स्नायू बळकट करण्यापेक्षा शैक्षणिक अनुभवावर सुद्धा अधिकाधिक भर दिला जात आहे.

प्रस्तुत शोध निंबधातून शारीरिक शिक्षण व क्रीडाच्या आंतरसंबधित विविध पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपण हे पाहतच आहोत की, भारतीय समाजात खेळांनी त्यांच्या उन्नतीच्या मार्गावर दीर्घ प्रवास केला आहे. सद्यपरिस्थितीत भारताची क्रीडाक्षेत्रातील परिस्थिती सुधारत असून शारीरिक व क्रीडा शिक्षणातून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शित शिक्षणामुळे आंतरराष्टीय आंतरराष्टीय  स्तरावर भारतीय क्रीडापटू सध्या नेत्रदीपक अशी प्रगती करत आहेत. सर्व खेळांमध्ये विशेषत: अथलेटिक्समध्ये आपल्याला सकारात्मक परिणाम मिळत असुन हे देशासाठी चांगले संकेत आहे. सरकारी योजना आणि क्रीडा धोरण या दोघांच्याही प्रामाणिक अश्या प्रयत्नांमुळे, क्रीडा कामगिरीमुळे भारतीय तिरंगा उंच उंचावेल अशी आपण भविष्यात आशा करू शकतो.

सूचनक शब्द : खेळाडू, आरोग्य, शारीरिक शिक्षण, खेळ, राष्ट्रविकास. 

प्रस्तावना : 

शारीरिक शिक्षण आणि खेळाच्या माध्यमातून मानवाचां शारीरिक, मानसिक, भावनिक विकास साधल्या जातो. खेळ व दैनंदिन नित्य व्यायामामुळे सुदृढ आरोग्य प्राप्त होण्यास मदत मिळते. परिणामी अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित होण्यास सहकार्य लागते.  शारीरिक शिक्षण आणि खेळाच्या माध्यमातून नागरिकां मध्ये सद्गुंनाचा, नैत्तिक मानवी मूल्यांचा विकास होतो. सक्षम पिढी निर्माण करुन राष्ट्राच्या विकासात्मक आणि गौरवशाली कार्य साधण्यात शारीरिक शिक्षण व क्रीडा संस्कृती ची भूमिका महत्त्वपूर्ण कार्य करते. मानवाच्या शारीरिक, बौद्धिक आणि नैतिक शक्ती विकसित करण्या बरोबरच व्यक्ती स्वातंत्र्याची हमी शैक्षणिक व्यवस्थेमधून आणि सामाजिक जीवनाच्या इतर पैलूंमधून प्राप्त होते.

शारीरिक शिक्षण कायद्यान्वये राष्ट्रासाठी संसाधनांची तरतूद करता येईल. सध्याच्या शैक्षणिक घडामोडींमध्ये मूल्यमापन प्रणाली विकसित केल्यास देशातील शारीरिक शिक्षणाच्या विकासास प्रोत्साहन देता येईल. कोणत्याही देशासाठी कोणत्याही वेळी शारीरिक शिक्षण आणि क्रीडा हे राष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण मापदंड तसेच सार्वत्रिक शिक्षणाचा अविभाज्य अंग असले पाहिजे. एवढेच नाही तर, प्रत्येक देशातील शिक्षण व्यवस्थेने शारीरिक शिक्षण आणि क्रीडा बाबीच्या सुधारित विकासासाठी संशोधनात्मक कृती आराखड्याची सवैधानिक चौकट तयार करून सार्वत्रिक प्रयत्नाची पराकाष्टा केली पाहिजे. आज घडीला भारतासह जगातील बहुतांश देश हे प्रसार माध्यम प्रकाश झोताच्या सहाय्याने खेळाची नेत्रदीपक भरभराट करीत असल्याचे दिसून येतात. परंतु शैक्षणिक क्षेत्रातही अश्याच प्रकारे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी देश पातळीवर मूलभूत पायाभूत सुविधा ह्या समाजातील सामान्य घटकापर्यंत पोहचवून खेळांमध्ये शिस्त निर्माण झाल्या तरच खऱ्या अर्थाने शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राचा विकास करता येणे शक्य होईल.

व्याख्या :

खेळला एक विशिष्ट अशी सांकेतिक भाषा असते. त्यामुळे देश विदेशातील लोकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित होण्यास खेळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. आज शारीरिक शिक्षणाच्या आधुनिक संकल्पनेमुळे जगाचा क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ झाला आहे.

काही क्रीडा तज्ञांच्या व्याख्या खालील प्रमाणे स्पष्ट करता येतील त्यामध्ये,

१. "विविध शारीरिक हालचालींद्वारे व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवाचे संघटित ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण". डी. ओबर्ट्युफर यांनी अशी व्याख्या केली आहे.

२. "शारीरिक शिक्षण हा एका मोठ्या समग्र अशा विषयाचा एक भाग असून त्याचा संबंध महत्त्वाच्या स्नायूंच्या हालचालींशी आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या क्रियांशी आहे". अशी व्याख्या डॉ. जे. बी. नॅश यांनी केली आहे.

४. "महत्त्वाच्या स्नायु-हालचालीं मधून मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवाद्वारे बालकाची सर्वाधिक अंतिम टप्प्या पर्यंतची वाढ व विकास साधणाऱ्या प्रक्रिया-समुच्चयास शारीरिक शिक्षण असे म्हणतात". ब्राउनेल यांनी अशी व्याख्या केली आहे.

५. शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे, म्हणजे शारीरिक शिक्षण होय', अशी व्याख्या भारताच्या केंद्रीय शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाने केलेली आहे.

सामान्य परिस्थितीत खेळाच्या वेळी, जसे की नेमबाजी करणे किंवा  शिकार करणे किंवा मासेमारीई. खेळांच्या विपरीत एखाद्या संघात्मक निर्देशित नियमांनुसार खेळल्या जाणाऱ्या क्रीडा बाबी या संघटित ऍथलेटिक स्पर्धा म्हणून गणल्या जात असत.

शारीरिक शिक्षण आणि खेळाची आवश्यकता :

आजचे शारीरिक शिक्षण हे आधुनिक शिक्षणाचा अविभाज्य असा भाग बनला आहे. क्रीडांगण ही बाब आज प्रत्येक शाळेसाठी अभिमानाचा व आवश्यक घटक झाला आहे.  शाळा महाविद्यालये विविध प्रकारच्या स्पर्ध्यामध्ये हिरहिरीने सहभाग घेऊन विजयी संघाचे प्रतिनिधीत्व करण्यावर भर देत आहेत. आजकालच्या प्रत्येक शाळा महाविद्यालये ही  शैक्षणिक कामानंतर मध्यातराच्या वेळेत किंवा खेळाच्या तासिकेत मनसोक्तपने खेळाचा मनमुराद आनंद घेतात. खेळाकडे दैनंदिन जीवनातील व्यस्त कामातून स्वतःला दूर सारून आनंद, उत्साह, नवचैतन्य व मनोरंजन करण्यासाठी एक उपयुक्त क्रीडा बाब म्हणून पाहिले जाते. क्रीडा कामगिरी, क्रीडा कौशल्य, तंत्र किंवा क्रीडा पत्रकारितेतील विशेष नोंदी ई. वर केवळ चर्चा करण्या इतपतच नव्हे तर शारीरिक शिक्षण आणि क्रीडा यांचा अभ्यास म्हणजे  सामान्य लोकांच्या काही कल्पित गृहितकांकडे लक्ष देणे नित्यावश्यक बाब झाली आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर भारतातील शारीरिक शिक्षण व खेळाची ढासळलेली स्थिती सुधारण्यासाठी प्रकर्षाने प्रयत्न करण्यात आले. त्यात प्रामुख्याने १९४७ नंतर भारत सरकारने विशेष प्रकारचे प्रयत्न केले. त्यामध्ये शारीरिक शिक्षण व खेळाचा विकास, प्रचार व  प्रसार  करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल उचलले गेले ते म्हणजे १९४८ मध्ये ताराचंद समिती स्थापन केली. या समिती मार्फत भारतातील शारीरिक शिक्षणाच्या तत्कालीन परीस्थितीचा आढावा घेऊन अभ्यास करून देशपातळीवर सुधारनात्मक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रकाच्या शिफारशी व उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या.  डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली शालेय पातळीवर १९४८ या वर्षी शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्राची उपयुक्तता यावर सरकारला मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी एक  समिती स्थापन करण्यात आली. इ.स. 1950 केंद्रिय सल्लागार व मनोरंजन मंडळाची शारीरिक शिक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर शासकीय धोरण कर्त्याना सल्ला देण्यासाठी स्थापना करण्यात आली. इ. स.1965 मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोठारी आयोगाने तर शाळां तसेच महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य स्वरूपात असण्याच्या गरजेवर भर दिला. एकूणच क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष शारीरिक शिक्षण महाविद्यालये सुरू करुन खेळाडूंना विविध खेळ आणि खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारने काही खास प्रकारच्या योजना सुरू केल्या होत्या. शारिरीक शिक्षण आणि क्रीडा यांच्या प्रचारासाठी काही खास धोरणही अमलात आणली होती. ठळकपणे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. विशेष करून काही महत्त्वाच्या समित्या आणि मंडळे नेमण्यात आली होती त्यामध्ये,

१. ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ स्पोर्ट्स (१९५४)

२. लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, ग्वाल्हेर (१९५७)

३. राष्ट्रीय क्रीडा संस्था, पटियाला (१९६१)

४. अखिल भारतीय क्रीडा परिषद (१९६५)

५. क्रीडा व युवक सेवा संचालनालय (१९७०)

६. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था बँगलोर (१९७३)

 ७. राष्ट्रीय क्रीडा धोरण (१९८०)

८. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय (१९८२)

९. भारतीय क्रीडा प्राधिकरण (१९८४)

१०. राष्ट्रीय क्रीडा धोरण(२००१)

ई.विषयी प्रकर्षाने सांगता येईल.

भारतामध्ये चालविण्यात येणारे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा अभ्यासक्रम देशातील अनेक दशकांमध्ये सर्वात जुने व्यवसायिक अभ्यासक्रम असून ह्या अंतर्गत क्रीडा डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर क्रीडा वैदकशास्त्र, क्रीडा पत्रकारिता, कायदे, तंत्रज्ञान, क्रीडा मार्गदर्शन ई. बाबतच्या अभ्यासक्रमाचे अद्ययावत शिक्षण दिले जात आहे.

शारीरिक शिक्षणाचे महत्त्व :

मानवाला दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. विशिष्ट हालचाल व खेळाच्या माध्यमातून ह्या समस्यांच्या सामना करण्याची क्षमता मानवाला प्राप्त करता येवू शकते.

शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, न्याय, तत्परता, दयाभाव, आत्मविश्वास, सदाचार, निष्ठा, धैर्य, सहकार्य, बंधुभाव, आदरभाव, सहानुभूती, परोपकारबुद्धी, संघभावना, खिलाडूवृत्ती, नेतृत्व, आज्ञाधारकपणा, सेवावृत्ती, सत्यप्रियता, शिस्त ई. वैयक्तिक गुणाचां विकास साध्य होतो.

विविध प्रकारच्या शारीरिक हालचाली, विशिष्ट तालबद्ध कवायती, व्यायाम, खेळ यांमुळे मुलांमध्ये अंतर्निहित विविध प्रकारचे बौद्धिक गुण विकसित होण्यास मदत होते. परिणामी शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचां सर्वांगीण विकास करणे शक्य आहे. विविध प्रकारच्या सांघिक खेळांमध्ये सहभागी झाल्यामुळे सहभागी खेळाडू हे एकमेकांसोबत सहकार्याने आणि समन्वयाने संघात काम करायला शिकतात.  शारीरिक क्रिया कलापांमध्ये भाग घेतल्याने, सहभागी विद्यार्थांचा संघ कायम प्रयत्नशिल राहतो. त्याची आपल्या संघावरील निष्ठा आणि विश्वास अधिकाधिक मजबूत होउन परस्परांमध्ये चांगले संबंध विकसित होतात.

शारीरिक शिक्षणाचे काही ठळकपणे महत्व पुढील प्रमाणे सांगता येईल.

१. व्यक्तीचे चांगले नैतिक चारित्र्य निर्माण करण्यास मदत होते.

२. विविध प्रकारच्या शारीरिक हालचाली मुळे विकासामुळे शरीराची कार्यकीय क्षमता विकसित होते व प्रतिकारक क्षमता सुधारते.

३. विविध प्रकारच्या शारीरिक क्रियाकलापांमध्ये सहभागी झाल्यामुळे प्रत्यक्ष सहभागी हे भावनिकदृष्ट्या, बौद्धिककदृष्ट्या प्रौढ व सक्षम होतात परिणामी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, बंधुभाव निर्माण होतो.

४. मानवी शरीर हे स्नायुं आणि मज्जा संस्थेच्या रचनेपासून निर्मित झाले आहे. शारीरिक रचनेला सुयोग्य व चांगल्या स्थितीत तंदुरुस्त ठेवण्यासाठी तसेच शरीराच्या इंद्रियामध्ये विविध प्रकारच्या क्रीडा युक्त हालचाली किंवा विशिष्ट क्रियाकलापच्या साह्याने समन्वय साधल्यास शरीर योग्यरित्या कार्य करेल.

५. वेगवेगळ्या खेळामध्ये वारंवार सहभागी झाल्यामुळे निर्णय क्षमता मानसिकदृष्ट्या चांगली विकसित होते.

६. क्रीडा व शारीरिक शिक्षणामुळे खेळाडूंमध्ये नेतृत्वगुण निर्माण होतात.

७. विविध प्रकारच्या क्रीडा युक्त हालचालींमध्ये सहभागी झाल्यामुळे खेळाडूंमध्ये ज्ञान कौशल्य वृंदिगत होतात.

८. दर्जेदार क्रीडाबाबी वा हालचालीमुळे खेळाडूना निःपक्षरित्या कौशल्याचे मूल्यांकन करण्याचे ज्ञान अवगत होते.

९. क्रीडा युक्त हालचालीमुळे विद्यार्थ्यांमध्येआनंददायी अनुभव निर्मिती होते.

शारीरिक शिक्षणाचे फायदे :

खालील मुद्द्यांच्या आधारे फायदे प्रतिपादित करता येईल.

१. शारीरिक सुदृढता सुधारते: 

विविध प्रकारच्या गतियुक्त हालचालीमुळे जसे की धावणे, उड्या मारणे, विशिष्ट  तालबद्ध व्यायामामुळे व्यक्ती अधिक तंदुरुस्त होतात. व्यक्ती अधिक सक्रिय बनुन आळशीपणा कमी होतो. प्रतिकारक क्षमता विकसित होऊन व्यक्तीचे जीवन निरोगी राहते.

२. सामाजिक दृष्टी विकसित होते:

शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजीकरणाची प्रक्रिया अधिक सक्षम होते. एकमेकांविषयी सांघिक भावना, परस्पर आदर, संघ एकात्मता, सहकार्य, ई सद्गुणांचा विकास झाल्यामुळे त्याच्या भावी आयुष्याला चालना मिळते.

३. आरोग्य संवर्धन होते:

दैनंदिन व्यायामामुळे शरीरातील इंद्रिय संस्थाची क्षमता विकसित होऊन रोग प्रतिकारक क्षमता, शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होते. आजारापासून मुक्ती मिळते. परिणामी आरोग्य संवर्धन जोपासता येते.

४. आनंद मिळतो:

विविध स्वरूपाच्या विशिष्टय मनोरंजक व मजेदार व्यायामामुळे व्यक्ती हर्ष- उल्हासित राहतात. त्यामुळे आनंद प्राप्ती होते.

५. ध्येय निश्चिती :

विद्यार्थ्यांना त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि लक्ष्य निश्चित करण्यासाठी वारंवार प्रेरित केल्या जाते. कालांतराने, विद्यार्थी हे चांगले ध्येय निश्चित करणारे आणि साध्य करणारे साधक बनतात.

६. इजा व दुखापत कमी होतात:

अनेक संशोधना अंती हे सिद्ध झाले आहे की, ज्या व्यक्ती नियमित व्यायामाचा वैज्ञानिक दृष्टीने नित्यनियमाने सराव करतात त्या व्यक्ती इजा व दुखापती पासून दूर राहतात.

७. आत्मसन्मान वृदिंगत होतो:

इतरांशी नियमित संवाद झाल्यामुळे विद्यार्थांचा एकमेकांतील आत्मसन्मान आणि स्व जागरूकता वृदींगत होतो.

८. भविष्यातील करिअरची संधी मिळते :

शारीरिक शिक्षण अंतर्गत अनेक प्रकारच्या करिअर करण्याच्या संधी उपलब्ध होतात जसे की जिम प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, क्रीडा प्रशिक्षक क्रीडा पत्रकार, खेळाडू ई.

९. शारीरिक शक्ती वाढते :

विविध प्रकारच्या खेळाच्या माध्यमातून व्यक्तीची शक्ती विकसित होते. जसे की दोरी वरील उडया, फुटबॉल, धावणे, पोहणे, ई खेळ नित्यानियमाने खेळल्यास व्यक्तीची शक्ती वाढण्यास मदत होते.

१०. प्रतिभा शोधता येते:

प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक व्यायाम वा खेळा दरम्यान प्रतिभा संपन्न खेळाडूला सहजपणे शोधू शकतात व त्यामुळे प्रतिभासंपन्न खेळाडूस योग्य वेळी सहजपणे मार्गदर्शन करता येईल.

११. निरुत्साहपणा कमी होतो:

शारिरीक शिक्षण क्षेत्रात असलेल्या बाबीमध्ये विविधताअसल्यामुळे प्रत्येकास प्रत्येकास  आपल्या इच्छेनुसार खेळता येऊन आनंद प्राप्त करून जीवन उल्हासित व उत्साही बनविता येते.

१२. संघ भावनेला प्रोत्साहन मिळते:

अनेकजण एखाद्या सामूहिक कृतीसाठी कसोशीने प्रयत्न करतात तेंव्हा त्यांच्या मध्ये परस्पर समन्वय विकसित होऊन विजय संपादित करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपोआपच संघ भावना निर्माण होते.

निष्कर्ष : 

सध्याच्या आधुनिक युगात भारतातील शारीरिक शिक्षण वा क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षण, मार्गदर्शन व शिक्षण तसेच क्रीडा संशोधन यामध्ये एकूणच काळाच्या ओघात आमूलाग्र व अपेक्षित बदल होत असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जेंव्हा आपण आपल्या शिक्षण वा संशोधन क्षेत्राच्या मापदंडाचा तुलनात्मकदृष्ट्या विचार करतो तेंव्हा त्याचे फारसे समाधानकारक अपेक्षित परिणाम मिळत नसल्याचे दिसून येते. सध्या भारतात प्रगत असलेल्या क्रीडा संस्था या क्षेत्रात प्रगल्भ असे शिक्षण देण्याचे कार्य करीत असून अशा केंद्रांमार्फत विविध स्तरावर संशोधनात्मक स्वरूपाचे कार्य सुरू आहे. आजघडीला भारतीय खेळ हे उन्नतीच्या मार्गावर प्रदीर्घ वाटचाल करीत आहेत. देशातील शासकीय अशासकीय यंत्रणा, संस्थात्मक यंत्रणा  पुढे सरसावून खेळांच्या प्रगतीसाठी भरीव व व्यापक स्वरूपाचे कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु या क्षेत्रात अजून  खूप काही करण्यासारखे आहे.

क्रीडा क्षेत्रातील विविध स्वरूपाचे रोख बक्षिसे, क्रीडा कोट्यातील नोकऱ्यांचे आरक्षण इत्यादी अनेक पातळ्यांवर विपुल प्रमाणात दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळेही जनसामान्यांचे क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी बदलत्या जीवनशैली प्रवाहानुसार आपल्याला क्रीडा अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे अभिप्रेत आहे. याबरोबरच क्रीडा शास्त्रज्ञांना उत्कृष्ट संशोधन सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज झाली आहे. एवढेच नाही तर क्रीडा धोरणांची योग्य अंमलबजावणी करणे ही एक प्रत्यक्ष सकारात्मक व महत्त्वाची बाब झाली असून शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील सर्वच पातळ्यांवरील उणिवा दूर करणे अभिप्रेत आहे. सारांक्षतःआपण असा निष्कर्ष काढू शकतो की, भारतातील शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन, व्यवस्थापन किंवा क्रीडा संशोधन इत्यादी क्षेत्रात अजूनखूप काही करण्यासारखे आहे.

संदर्भ :

  1. भारत विद्यापीठ अनुदान आयोग चा अहवाल, शारीरिक शिक्षण समिती नवी दिल्ली   १९६७,५.
  2. कमलेश एम.एल. पेपर तिसरा शारीरिक शिक्षणावर युजीसी नेट डायजेस्ट, नवी दिल्ली: खेल साहित्य केंद्र २०००, ४७६. ८. देशपांडे एस.एच. मधील अभ्यासक्रमांच्या पुनर्रचनेची गरज शारीरिक शिक्षण विद्यापीठ बातम्या. २०००, ३८(१):१२
  3. खेळ आणि खेळ. द न्यू एनसायक्लोपीडिया ब्रिटनमध्ये १५ वी आवृत्ती १९९७, ११:११२.
  4. कालेस एम.एल., संगरिया एम.एस. शारीरिक आणि शारीरिक शिक्षणाचा इतिहास, पार्कस ब्रदर्स, लुधियाना. १९८८.
  5. मेयर्स एम.सी. खेळातील कामगिरी वाढवणे: क्रीडा शास्त्राचे प्रशिक्षणासह विलीनीकरण इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्पोर्ट्स सायन्स अँड कोचिंग २०००; १:८९- १००.
  6. देवी एल.यु. साठी माहिती नेटवर्कच्या अभ्यासावर शारीरिक शिक्षण आणि खेळ लायब्ररी हेराल्ड. १९९९; ३७(३):२१२.
  7. ग्रेवाल सी.एस. शारीरिक शिक्षण का, व्यायाम विद्याम्, नोव्हेंबर. १९९८, २२(४):१५-१९.
  8. क्रिस्टोफर सी. थॉमस आर. मार्क डब्ल्यू.ए. कामगिरी मैदानी खेळांसाठी मूल्यांकन. लंडन: रूटलेज, २००९, २५. वुस्ट डी.ए, बुचर चार्ल्स. ए. शारीरिक शिक्षण, व्यायाम विज्ञान आणि खेळाचे फाउंडेशन.
  9. बोस्टन: मॅकग्रा जे.नकिन्स, सायमन पी.आर स्पोर्ट्स सायन्स हँडबुक: किनेसियोलॉजी, स्पोर्ट्स आणि एक्सरसाइज सायन्ससाठी आवश्यक मार्गदर्शक, यूके: मल्टी- सायन्स पब्लिशिंग कंपनी लिमिटेड २००५; २, १-७.२८८.
  10. https://mr.vikaspedia.in/education/child


Sign In  /  Register

Most Downloaded Articles

Acquire employability in Indian Sinario

Department of Mathematics @ GFGC Tumkur

The Pink Sonnet

ಸುಕೌಶಳ ಸ್ವಾಮಿಯ ಕಥೆ : ಸ್ತ್ರೀಪಾತ್ರ ಚಿತ್ರಣ

ಕವನಗಳು : ನಿಸರ್ಗವೇ ಸ್ವರ್ಗ -  ಹೂಮನದ ಕೋಪ




© 2018. Tumbe International Journals . All Rights Reserved. Website Designed by ubiJournal